Monday, October 10, 2016

हादगा (हादग्याची गाणी)/ Hadaga (Hadagyachi Gaani)

I have so many childhood memories of “Hadga” (हादगा), a traditional festival which is celebrated in the marathi month of Ashwin (अश्विन) and starts on hast nakshatra (हस्त नक्षत्र). It’s called by different names such as hadaga (हादगा), bhondla (भोंडला), bhulabai (भुलाबाई) in different regions of Maharashtra. We draw elephant on a slate, place that slate at the center and walk around it in a circle by holding hands and singing different songs. It goes for 16 days. This tradition is slowly getting lost nowadays. Sometimes I feel after coming abroad, that we deliberately try to keep these traditions alive. I don’t know what’s the real motivation behind such festivals, but I feel like, as old days, these events help us come together, even miles away from our motherland.


So this is my humble effort to preserve those songs of hadaga in one place.



१ ऐलमा पैलमा

ऐलमा पैलमा गणेश देवा
मझा खेळ मांडूदे करीन तुझी सेवा
मांडला ग मांडला वेशीच्या दारी
पारवळ घुमतय बुरजावरी
गुंजावानी डोळ्यांच्या सारवीन टिक्का
आमच्या गावच्या भुलोजी नायका
एवीन गा तेवीन गा
कांडा तीळ बाई तांदूळ घ्या
आमच्या आया तुमच्या आया
खातील काय दूध उंडे 
उंड्यांची लागली टाळी
आयुष्य दे रे ब्रम्हाळी
माळी गेला शेता भाता
पाऊस पडला येता जाता
पड पड पावसा थेंबा थेंबी
थेंबा थेंबीच्या आळ्या लोंबी
आळ्या या लोंबती आंखणा
आंखणा तुझी सात कणसं
हातग्या तुझी सोळा वर्षं


२ शिवाजी आमुचा राजा


शिवाजी आमुचा राजा
त्याचा तो तोरणा किल्ला
किल्ल्यामधे सात विहिरी
विहिरी मधे सात कमळं
एक एक कमळं तोडीलं
भवानी मातेला अर्पण केलं
भवानी माता प्रसन्न झाली
शिवरायाला तलवार दिली
तलवार घेवूनी आला
हिंदुंचा राजा तो झाला
हिंदुंनी त्याचे स्मरण करावे
हादग्या पुढे गाणे गावे

३ अक्कणमाती चिक्कणमाती


अक्कणमाती चिक्कणमती
अश्शी माती सुरेख बाई
खळगा तो खणवा
अस्सा खळगा सुरेख बाई
जातं ते रोवावं
अस्सं जातं सुरेख बाई
रवा पीठी काढावी
अश्शी रवा पीठी सुरेख बाई
करंज्या कराव्या
अश्श्या करंज्या सुरेख बाई
तबकी ठेवाव्या
अस्सं तबक सुरेख बाई
शेल्याने झाकावं
अस्सा शेला सुरेख बाई
पालखी ठेवावा 
अश्शी पालखी सुरेख बाई
माहेरी धाडावी
अस्सं माहेर सुरेख बाई
खायाला मिळतं
अस्सं सासर द्वाड बाई
कोंडोनी मारतं


४ श्रीकांता कमलाकांता 


श्रीकांता कमलकांता अस्सं कस्सं झालं
अस्सं कस्सं वेडं माझ्या कपाळी आलं
वेड्याच्या बायकोने केल्या होत्या करंज्या
तिकडून आला वेडा त्याने निरखुनी पाहिल्या
होडी होडी म्हणून त्याने पाण्यात सोडिल्या
वेड्याच्या बायकोने केले होते लाडू
तिकडून आला वेडा त्याने निरखुनी पाहिले
चेंडू चेंडू म्हणून त्याने खेळायला घेतिले
वेड्याच्या बायकोने केल्या होती चकली
तिकडून आला वेडा त्याने निरखुनी पाहिली
चक्र चक्र म्हणून त्याने फ़िरवुनी सोडिली
वेड्याच्या बायकोने केल्या होत्या शेवया
तिकडून आला वेडा त्याने निरखुनी पाहिल्या
आळ्या आळ्या म्हणून त्याने पाण्यात सोडिल्या
वेड्याच्या बायकोने केले होते श्रीखंड
तिकडून आला वेडा त्याने निरखुनी पाहिले
गंध गंध म्हणून त्याने अंगाला फासले
वेड्याची बायको झोपली होती पलंगावर
तिकडून आला वेडा त्याने निरखुनी पाहिले
मेली मेली म्हणून त्याने जाळून टाकिले

५ नणंदा भावजया 


नणंदा भावजया दोघी जणी
घरात नव्हते तिसरे कोणी
शिंक्यावरचे लोणी खाल्ले कोणी
मी नाही खाल्ले वहिनीने खाल्ले
आता माझा दादा येईल गं
दादाच्या मांडिवर बसेन गं
दादा तुझी बायको चोरटी
असूदे माझी चोरटी
घे काठी लाग पाठी
घरादाराची लक्ष्मी मोठी


६ सासरचा वैद्य आणा


माझ्या सासरचा वैद्य आणा बाई वैद्य आणा
त्याला बसायला लंगडी घोडी बाई लंगडी घोडी
त्याला नेसायला फाटकं धोतरं बाई फाटकं धोतरं
त्याच्या हातातं जळकं लाकूड बाई जळकं लाकूड
त्याच्या कपाळी शेणाचा टिळा बाई शेणाचा टिळा
त्याच्या तोंडात पादरा किडा बाई पादरा किडा
कसा दिसतो भिका-यावाणी बाई भिका-यावाणी


माझ्या माहेरचा वैद्य आणा बाई वैद्य आणा
त्याला बसायला निळी घोडी बाई निळी घोडी  
त्याला नेसायला रेशमी धोतरं बाई रेशमी धोतरं
त्याच्या हातातं नक्षीदार काठी बाई नक्षीदार काठी
त्याच्या कपाळी चंदनाचा टिळा बाई चंदनाचा टिळा
त्याच्या तोंडात रंगला विडा बाई रंगाला विडा
कसा दिसतो राजावाणी बाई राजावाणी

७ आज कोण वार बाई आज कोण वार


आज कोण वार बाई आज कोण वार
आज वार सोमवर, महादेवाला नमस्कार
आज कोण वार बाई आज कोण वार
आज वार मंगळवार, मंगळारीला नमस्कार
आज कोण वार बाई आज कोण वार
आज वार बुधवार, बुधबृहस्पतीला नमस्कार
आज कोण वार बाई आज कोण वार
आज वार गुरूवार, दत्ताला नमस्कार
आज कोण वार बाई आज कोण वार
आज वार शुक्रवार, महालक्ष्मीला नमस्कार
आज कोण वार बाई आज कोण वार
आज वार शनिवार, मारूतीला नमस्कार
आज कोण वार बाई आज कोण वार
आज वार रविवार, सूर्यदेवाला नमस्कार 


८ मला आलं मूळ


सोन्याचा करंडा बाई मोत्याचं झाकण
तिथे आमच्या सासूबाई कुंकू लावीत होत्या
सासूबाई सासूबाई मला आलं मूळ
मला काय पुसतीस बरीच दिसतीस, पूस जा आपल्या सास-याला
सोन्याचा दौत बाई मोत्याची लेखणी
तिथे आमचे मामंजी लिहीत होते
मामंजी मामंजी मला आलं मूळ
मला काय पुसतीस बरीच दिसतीस, पूस जा आपल्या जावेला
सोन्याचा डेरा बाई मोत्याची रवी
तिथे आमच्या जाऊबाई ताक घुसळीत होत्या
जाऊबाई जाऊबाई मला आलं मूळ
मला काय पुसतीस बरीच दिसतीस, पूस जा आपल्या दिराला
सोन्याचा विटू बाई मोत्याची दांडी
तिथे आमच्या भाऊजी खेळत होते
भाऊजी भाऊजी मला आलं मूळ
मला काय पुसतीस बरीच दिसतीस, पूस जा आपल्या नणंदेला
सोन्याची सुपली बाई मोत्यानी गुंफ़िली
तिथे आमच्या वन्स पाखडीत होत्या
वन्सं वन्सं मला आलं मूळ
मला काय पुसतीस बरीच दिसतीस, पूस जा आपल्या नव-याला
सोन्याचा पलंग बाई मोत्याचे खूर
तिथे आमचे पतिराज निजले होते
पतिराज पतिराज मला आलं मूळ
आणा फ़णी घाला वेणी, जाऊ दे राणी माहेरा
जाती तशी जाऊ दे, निळ्या घोडिवर बसू दे
निळी घोडी हासली, सखूबाई सुंदर दिसली


९ अरडी बाई परडी गं


अरडी बाई परडी गं, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मुल कोण गं
दारी मुल सासरा, सास-यांनी काय आणलं गं
सास-यानी आणल्या पाटल्या, पाटल्या मी घेत नाही सांगा मी येत नाही
चारी दरवाजे लाव गं सई, झिप्र कुत्र सोड गं सई
अरडी बाई परडी गं, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मुल कोण गं
दारी मुल सासू, सासूनं काय आणलं
सासूनी आणले तोडे, तोडे मी घेत नाही सांगा मी येत नाही
चारी दरवाजे लाव गं सई, झिप्र कुत्र सोड गं सई


अरडी बाई परडी गं, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मुल कोण गं
दारी मुल दीर, दिरानी काय आणलं
दिरानी आणल्या बांगड्या, बांगड्या मी घेत नाही सांगा मी येत नाही
चारी दरवाजे लाव गं सई, झिप्र कुत्र सोड गं सई
अरडी बाई परडी गं, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मुल कोण गं
दारी मुल जाऊ, जावेने काय आणलं
जावेनी आणली नथं, नथ मी घेत नाही सांगा मी येत नाही
चारी दरवाजे लाव गं सई, झिप्र कुत्र सोड गं सई
अरडी बाई परडी गं, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मुल कोण गं
दारी मुल नणंद, नणंदेनी काय आणलं
नणंदेनी आणल्या साखळ्या, साखळ्या मी घेत नाही सांगा मी येत नाही
चारी दरवाजे लाव गं सई, झिप्र कुत्र सोड गं सई
अरडी बाई परडी गं, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मुल कोण गं
दारी मुल पतिराज, पतीने काय आणलं
पतीने आणलं मंगळसूत्र, मंगळसूत्र मी घेते सांगा मी येते
चारी दरवाजे उघड गं सई, झिप्र कुत्र बांध गं सई


१० आड बाई आडोणी


आड बाई आडोणी
आडाच पाणी काढोनी
आडात होती सुपारी
आमचा हातगा दुपारी


आड बाई आडोणी
आडाच पाणी काढोनी
आडात होता शिंपला
आमचा हादगा संपला 

११ एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू


एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू
दोन लिंबू झेलू बाई तीन लिंबू झेलू
तीन लिंबू झेलू बाई चार लिंबू झेलू
चार लिंबू झेलू बाई पाच लिंबू झेलू
पाच लिंबू पाणवठा माळ घाली हणमंता
हणमंताची निळी घोडी, येता जाता कमळे तोडी
कमळाच्या पाठिमागे होती राणी, अगं अगं राणी इथं कुठं पाणी
पाणी नव्हे यमुना जमुना, यमुना जमुनाची बारिक वाळू
तेथे खेळे चिनारी बाळू,
चिनारी बाळुला भुक लागली, सोन्याच्या शिंपीनी दूध पाजले
निज निज बाळा वेल्हाळा, गौराई जाते माहेरा
गौराई तुझं जाणं गं, आता कधी येणं गं
आता येणं चैत्र मास, चैत्रा चैत्रा लवकर ये
हस्त घालीन हस्ताला, देव बसवीन देव्हारा
देव्हा-याच्या चौकटी
उठता बसता लाथा बुक्की


१२ कृष्ण घालीतो लोळण


कृष्ण घालीतो लोळण, यशोदा आलिया धावून
काय रे मागतोस बाळा तुजला देते मी आणून
आई मला चंद्र दे धरुन, त्याचा चेंडू दे करुन
आसलं रे कसलं वागणं तुझं जगाच्या वेगळं
कृष्ण घालीतो लोळण, यशोदा आलिया धावून
काय रे मागतोस बाळा तुजला देते मी आणून
आई मला चांदण्या दे धरुन, त्याच्या लाह्या दे करुन
आसलं रे कसलं वागणं तुझं जगाच्या वेगळं
कृष्ण घालीतो लोळण, यशोदा आलिया धावून
काय रे मागतोस बाळा तुजला देते मी आणून
आई मला ढग दे धरुन, त्याची गादी दे करुन
आसलं रे कसलं वागणं तुझं जगाच्या वेगळं
कृष्ण घालीतो लोळण, यशोदा आलिया धावून
काय रे मागतोस बाळा तुजला देते मी आणून
आई मला साप दे धरुन, त्याचा चाबुक दे करुन
आसलं रे कसलं वागणं तुझं जगाच्या वेगळं
कृष्ण घालीतो लोळण, यशोदा आलिया धावून
काय रे मागतोस बाळा तुजला देते मी आणून
आई मला विंचू दे धरुन, त्याची अंगठी दे करुन
आसलं रे कसलं वागणं तुझं जगाच्या वेगळं


१३ काळी चंद्रकला नेसू कशी


काळी चंद्रकला नेसू कशी?
पायात पैंजण चालू कशी?
दमडीच तेल आणू कशी?
दमडीच तेल आणलं
मामंजींची शेंडी झाली
भाऊजींची दाढी झाली
सासुबाईंच न्हाणं झालं
वन्सबाईंची वेणी झाली
उरलेलं तेल झाकून ठेवलं
लांडोरीचा पाय लागला
वेशीपर्यंत ओघळं गेला
सासुबाई सासुबाई अन्याय झाला
दही भात जेवायला घाला
माझ उष्टं तुम्हीच काढा


१४ कारल्याचं बी पेर गं सुने


कारल्याचं बी पेर गं सुने मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कारल्याचं बी पेरलं की हो सासुबाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा
कारल्याचा वेल येऊ दे गं सुने मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कारल्याचा वेल आला की हो सासुबाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा
कारल्याला कारलं येऊ दे गं सुने मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कारल्याला कारलं आलं की हो सासुबाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा
कारल्याची भाजी कर गं सुने मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कारल्याची भाजी केली की हो सासुबाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा
कारल्याची भाजी खा गं सुने मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कारल्याची भाजी खाल्ली की हो सासुबाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा
खाल्लेलं उष्टं काढं गं सुने मग जा आपुल्या माहेरा माहेरा
खाल्लेलं उष्टं काढलं कि हो सासुबाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा
आणा फ़णी घाला वेणी जाऊदे राणी माहेरा माहेरा
आणली फ़णी घातली वेणी गेली राणी माहेरा माहेरा


१५ यादवराया राणी रुसून बसली कैशी


सासुरवाशी सुन रुसून बसली ऐशी, यादवराया राणी घराशी येईना कैशी
सासू गेली समजावयाला, उठा उठा सुनबाई चला घरला
निम्मा संसार देते तुम्हाला
निम्मा संसार नको आम्हाला, मी नाही यायची तुमच्या घराला
सासुरवाशी सुन रुसून बसली ऐशी, यादवराया राणी घराशी येईना कैशी
सासरा गेला समजावयाला, उठा उठा सुनबाई चला घरला
दौत लेखणी देतो तुम्हाला
दौत लेखणी नको आम्हाला, मी नाही यायची तुमच्या घराला
सासुरवाशी सुन रुसून बसली ऐशी, यादवराया राणी घराशी येईना कैशी
जाऊ गेली समजावयाला, उठा उठा जाऊबाई चला घरला
ताकाचा डेरा देते तुम्हाला
ताकाचा डेरा नको आम्हाला, मी नाही यायची तुमच्या घराला
सासुरवाशी सुन रुसून बसली ऐशी, यादवराया राणी घराशी येईना कैशी
दीर गेला समजावयाला, उठा उठा वहिनी चला घरला
विट्टी दांडू देतो तुम्हाला
विट्टी दांडू नको आम्हाला, मी नाही यायची तुमच्या घराला
सासुरवाशी सुन रुसून बसली ऐशी, यादवराया राणी घराशी येईना कैशी
नणंद गेली समजावयाला, उठा उठा वहीनी चला घरला
सोन्याची सुपली देते तुम्हाला
सोन्याची सुपली नको आम्हाला, मी नाही यायची तुमच्या घराला
सासुरवाशी सुन रुसून बसली ऐशी, यादवराया राणी घराशी येईना कैशी
नवरा गेला समजावयाला, उठा उठा बाईसाहेबा चला घरला
लाल चाबूक देतो तुम्हाला
लाल चाबूक हवा आम्हाला, मी येते तुमच्या घराला
सासुरवाशी सून ऊठून बसली ऐसी
यादवराया राणी घरासी आली कैसी

१६ हरिच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली


हरिच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली
त्यातलं उरलं एवढसं पीठ, त्याचं केलं थालिपीठ
नेऊन वाढलं पानात जिलबी बिघडली
हरिच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली
त्यातला उरला एवढासा पाक, त्याचा केला साखरभात
नेऊन वाढला पानात जिलबी बिघडली
हरिच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली
त्यातली उरली एवढिशी कळी, त्याची केली बुंदेकळी
नेऊन वाढली पानात जिलबी बिघडली
हरिच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली
त्यातलं उरलं एवढसं तूप, त्याच्या केल्या छान पु-या
नेऊन वाढल्या पानात जिलबी बिघडली


१७ बाजारातून आणला एकच आंबा


बाजारातून आणला एकच आंबा
त्याचं केलं सुंदर लोणचं
ते मी लोणचं मामंजीना वाढलं
मामंजीनी मला शाबासकी दिली
त्याचं मला हसू आलं
ते मी हसू तांब्यात भरलं
तो मी तांब्या गंगेला वाहिला
गंगेने मला पाणी दिलं
ते मी पाणी झाडांना घातलं
झाडाने मला फुले दिली
ती मी फुले हदग्याला वाहिली


१८ माझ्या सुंद्रीच लगीन


माझ्या सुंद्रीच लगीन
व-हाडी कोण कोण येणार माझ्या सुंद्रीच लगीन
आई म्हणे मी आई, करीन लग्नात घाई
माझ्या सुंद्रीच लगीन
बहीण म्हणे मी बहीण, जाईन पाठराखीण
माझ्या सुंद्रीच लगीन
भाऊ म्हणे मी भाऊ, आणिन नवरा पाहून
माझ्या सुंद्रीच लगीन
मामा म्हणे मी मामा, येईन कामा धामा
माझ्या सुंद्रीच लगीन
मामी म्हणे मी मामी, करीन चहा पाणी
माझ्या सुंद्रीच लगीन
भट म्हणे मी भट, धरीन अंतरपाट
माझ्या सुंद्रीच लगीन


१९ हस्त हा दुनियेचा राजा


हस्त हा दुनियेचा राजा
तयासी नमस्कार माझा
नमस्कारा सरशी वारा
मागून आल्या मेघधारा
दहा मधले एक गेले
हस्ताची मग पाळी आली
म्हणून त्याने गम्मत केली
त्याच्या योगे झाला चिखल
त्या बाई चिखलात लावली केळी
एक एक केळ मोठालं
हदग्या देवा वाहीलं









6 comments:

  1. Lovely dear..... Khup sari gani athavali ani sagalya athavani tajya jhalya...... - Shailaja

    ReplyDelete
  2. Thank you so much hi gaani share kelyabaddal :)
    Sneha

    ReplyDelete
  3. I hv beautiful childhood memories of bhondla. Now i am doing it again just cos i love it. Thanks for the songs..remember them somewhat in chorus but will byheart them for my upcoming bhondla. Thx!!

    ReplyDelete
  4. I am replying to you all bit late. But I am really glad it recalled so many memories and helped you all!

    ReplyDelete

Dahi Pohe (दही पोहे) (Flattened rice with curd)

Thick Flattened Rice We have a saying, if someone offers you poha (any flattened rice dish), you never say no to it. At least eat a spo...